West Bengal Lok Sabha Election 2024: कूचबिहारमधील मतदान केंद्रावर CRPF जवानाचा मृत्यू; वॉशरूममध्ये आढळला मृतदेह
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

West Bengal Lok Sabha Election 2024: पश्चिम बंगालमधील (West Bengal) माथाभंगा येथे मतदान केंद्रावर (Polling Booth) सीआरपीएफ जवानाचा (CRPF Jawan) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, शिपाई बाथरुममध्ये पडला होता, त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री घडली. माथाभंगा येथील मतदान केंद्राच्या बाथरूममध्ये सीआरपीएफ जवान बेशुद्धावस्थेत आढळून आला. लोकांनी त्याला पाहिल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या जवानाच्या डोक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (हेही वाचा -Lok Sabha Election 2024: अभिनेते Rajnikanth, RSS Chief Mohan Bhagwat,तामिळनाडू चे मुख्यमंत्री DMK chief MK Stalin यांनी बजावला लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क! (Watch Video))

जवान बाथरुममध्ये पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. कोणत्याही अनियमिततेबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (India National Elections 2024 Google Doodle: भारत मधील 2024 च्या निवडणुका मतदानाचा आज पहिला टप्पा; गूगल कडून खास डूडल)

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी होत आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात अनेक केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्रीही रिंगणात आहेत. मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असतील जिथे निवडणुका संपतील. पश्चिम बंगालमधील कूचबिहार, अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी या तीन जागांवरही मतदान होत आहे.