Former MLA Pascal Dhanare Passes Away: भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन
Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे भाजपच्या एका माजी आमदाराचा मृत्यू झाला आहे. पास्कल धनारे (Paskal Dhanare) असे या आमदाराचे नाव आहे. गुजरात राज्यातील वापी येथे असलेल्या रेनबो हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विधानस निवडणूक 2024 मध्ये ते डहाणू मतदारसंघातून भाजप (BJP) तिकीटावर निवडूण आले होते. धनारे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरस झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. डहाणू मतदारसंघातून निवडूण आलेले भाजपचे ते पहिलेच आमदार होते.

गुजरातमधील डहाणू विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांचा गड समजला जायचा. गेली अनेक वर्षे या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा किंवा डाव्या आघाडीचा उमेदवार निवडूण येत असे. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये पहिल्यांदा भाजपच्या तिकीटावर इथे उमेदवार निवडून आला. हा उमेदवार म्हणजे पास्कल धनारे होते. त्यामुळे धनारे यांच्या विजायकडे एक महत्त्वाचा विजय म्हणून पाहिले जात होते. दरम्यान, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर धनारे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी होती. परिणामी विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने उमेदवारी देऊनही धनारे यांचा पराभव झाला.

काँग्रेसचे बिलोली येथील विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचेही निधन झाले आहे. शनिवारी पहाटे मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. एक तळागाळातील नेता अशी त्यांची ओळक होती. साधारण तीन आठवड्यांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (हेही वाचा, धक्कादायक! कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे दुकान बंद झाल्याने उस्मानाबादेत सलून मालकाची आत्महत्या)

दरम्यान, नाशिक येथील प्रभाग क्रमांक 24 मधील शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतेच परंतू, त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत होती. अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या प्रभागात आणि स्थानिक शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या एक धडाडीच्या नगरिसेविका आणि स्थानिक नेत्या अशी त्यांची ओळख होती.

दरम्यान, पालघर येथील भाजप जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचेही कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावरही गुजरात राज्यातील वापी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेलेली लक्ष्मण वरखंडे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर त्यांच्या निधाननंतरच थांबली.