Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

छत्तीसगडमध्ये निवडणुकीपुर्वी एका नेत्याची हत्या करण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजनंदगावमधील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते बिरजू तारामा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेअंतर्गत छत्तीसगडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे, असे माजी मुख्यमंत्री रमण सिंघ यांनी म्हटले आहे. अज्ञात लोकांनी यांच्यावर घरात घूसून गोळी झाडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते या प्रकरणात गुंतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार अज्ञात लोकांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली. या घटनेत त्यांचा जागीत मृत्यू झाला. या घटनेअंतर्गत भाजपाच्या कार्यकत्यांनी निषेध केला आहे. जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे, असं म्हटलं आहे. औढी पोलिस या घटनेची चौकशी करत आहे. या घटनेमुळे सरखेडागावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ यांनी या घटनेला टार्गेट किलिंग म्हटले आहे. साओ म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते याला घाबरणार नाहीत आणि पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ म्हणाले की, पक्षाचा आणखी एक कार्यकर्ता शहीद झाला आहे. बिरजू तारामची हत्या ही भाजप कार्यकर्त्याची आणखी एक टार्गेट हत्या आहे. या आधी जून मध्ये स्थानिक भाजप नेत्याची हत्या केली होती.