Indigo Flight Emergency Landing: चेन्नईला जाणार्या इंडिगो फ्लाइट (Indigo Flight) 6E 2789 च्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या विमानात एकूण 231 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. उड्डाण दरम्यान ही घटना घडल्याने विमान चालकाने विमान सुरक्षितपणे उतरण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, विमान 22:38 वाजता यशस्वीरित्या खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानातील सर्व लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली. फ्लाइट क्रूने त्वरित प्रतिसाद आणि आपत्कालीन परिस्थिती कुशलतेने हाताळल्याने विमान सुरक्षित लँडिंग करण्यात आले. (हेही वाचा - एअर इंडियाच्या मगदानमध्ये अडकलेल्या बोईंग विमानातील त्रुटी दुरुस्त; विमान मुंबईत दाखल)
चेन्नईकडे जाणारं हे विमान दिल्ली विमानतळावरून रात्री 9.46 वाजता निघाले होते. ते रात्री 12:24 वाजता चेन्नईला पोहोचणार होते. मात्र, विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात डिब्रुगढला जाणार्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याचे गुवाहाटीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. या विमानात केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली, आसामचे राज्यपाल आणि सुमारे 150 प्रवासी होते.