Uttar Pradesh Rape Case: उत्तर प्रदेशमध्ये 14 वर्षीय मुलीवर बस कंडक्टरचा बलात्कार, पोलिसांनी घातल्या आरोपीला बेड्या
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपाखाली एका बस कंडक्टरला अटक (Arrest) करण्यात आली आहे. सोमवारी रात्री अल्पवयीन मुलगी तिच्या आईसह, उत्तर प्रदेशहून दिल्लीला (Dehli) जात असताना कथित बलात्कार झाला. मुलीच्या आईने देखील आरोप केला की बस कंडक्टर (Bus conductor) आणि मदतनीसाने गैरवर्तन केले. तसेच तिला दारू पिण्यास भाग पाडले. हे सर्व 30 प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये घडले. तिच्या तक्रारीत, अल्पवयीन मुलीच्या आईने सांगितले की, ती रात्री साडेअकराच्या सुमारास बदरपूर सीमेवर बसमध्ये चढली होती. ती तिच्या मूळ गावी शिकोहाबादला जात होती. तिची मुलगी आणि भाचीही तिच्यासोबत प्रवास करत होती. सुमारे 10-15 किमी वर, कंडक्टर आणि मदतनीसाने माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मला दारू पाजण्याचा प्रयत्न केला. मी बाटली खिडकीतून फेकून दिली, असे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

जेव्हा बस एका ठिकाणी थांबली आणि प्रवासी ताजेतवाने होण्यासाठी बाहेर पडले तेव्हा महिलेने सांगितले की ती वॉशरूममध्ये गेली. जेव्हा ती परत आली, तेव्हा ती म्हणाली, तिची मुलगी बेपत्ता होती. काही वेळानंतर, मी माझी मुलगी परत येताना पाहिली. ती रडत होती. तिने मला सांगितले की कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी मी आवाज उठवला आणि इतर प्रवाशांना सांगितले. जेव्हा मी बस थांबवण्यास सांगितले तेव्हा माझं त्यांनी ऐकलं नाही, असं आई म्हणाली.

ती पुढे म्हणाली की कंडक्टर आणि मदतनीस बस आणि जेवर टोल प्लाझा दरम्यान कुठेतरी बसमधून उतरले. महिलेच्या मुलाने आणि मेहुण्याने अखेर फिरोजाबादमध्ये बस थांबवली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी कंडक्टरला अटक केली आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याचा मदतनीस फरार आहे. हेही वाचा Bengaluru Suicide Case: बंगळूरूमध्ये मुलींना फाशी देत आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, यात मोठ्या मुलीचा मृत्यू

आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली आणि फिरोजाबादमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. त्याच्या साथीदारावर विनयभंगाचा हेतूने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार आहे. फिरोजाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.