Bengaluru Suicide Case: बंगळूरूमध्ये मुलींना फाशी देत आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, यात मोठ्या मुलीचा मृत्यू
Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशात आत्महत्येच्या (Suicide) घटना वारंवार घडत आहेत. नुकतीच बंगळूरूमधून (Bengaluru) एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. जिथे आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एका महिलेने तिच्या दोन अल्पवयीन मुलींना फाशी देण्याचा प्रयत्न केला. ही घटना 20 सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या डिब्बर गावात घडली आहे. वरलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलेची शेजाऱ्यांनी सुटका केली. तसेच तिच्यावर सध्या दवाखान्यामध्ये (Hospital) उपचार सुरू आहेत. तिची एक मुलगी घरातून पळून गेल्याने वाचली. तिच्या मोठ्या बहिणीचा मात्र मृत्यू झाला आहे. पती पुत्रराजू यांना कोविड 19 मध्ये गमावल्यानंतर वरलक्ष्मी नैराश्यात होती, असे  अहवालात म्हटले आहे. 20 सप्टेंबर रोजी तिने 12 वर्षीय दिव्याश्री आणि 8 वर्षीय मुग्धा या मुलींना फाशी देण्याचा निर्णय घेतला. तिचे आयुष्यही संपवले.

वरलक्ष्मीर आणि दिव्याश्री आत्महत्येसाठी तयार होत असताना मुग्धा तिच्या घराबाहेर पळून गेली. तसेच मदतीसाठी ओरडली, असे अहवालात म्हटले आहे. त्यांच्या शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि महिलेला आणि तिच्या मोठ्या मुलीला खाली आणले. आई-मुलीच्या जोडीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले .जेथे डॉक्टरांनी दिव्यश्रीला मृत घोषित केले. वरलक्ष्मीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने आपल्या मुलींना आत्महत्या करण्यास राजी केले असावे कारण ती त्यांची काळजी घेण्यासाठी धडपडत होती. हेही वाचा Corona Virus Update: देशात गेल्या 24 तासांत 26,964 जणांना कोरोनाची लागण, तर 383 बाधितांचा मृत्यू

ती महिला तिच्या मुलींना फाशी देण्याइतकी मजबूत नव्हती. आम्हाला शंका आहे की तिघांनीही स्वतःला फाशी देण्याची व्यवस्था केली होती, असे पोलिसांच्या हवाल्याने सांगण्यात आले. त्यांचा असा विश्वास आहे की मुग्धा शेवटच्या क्षणी घाबरली असेल आणि पळून गेली असेल. तिच्या मोठ्या बहिणीने स्वत: ला गळफास लावला की तिच्या आईने फाशी दिली याची ते चौकशी करत आहेत. या प्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर मुग्धा तिच्या काकांकडे राहत आहे. एका ग्रामपंचायत सदस्याने असेही सांगितले की वरलक्ष्मी तिच्या पतीचे कोविड 19 मुळे निधन झाल्यानंतर उदास होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.