मुस्लिम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणाऱ्या (Bulli Bai App Case) प्रकरणात न्यायालयाने आरोपी श्वेता सिंग आणि मयंक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपली. त्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले की, मयंक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात आले नाही. तर श्वेता सिंग न्यायालयात हजर झाली. श्वेता सिंग आणि मयंक रावत यांच्याशिवाय आसाममधून अटक करण्यात आलेले दोन आरोपी विशाल झा आणि नीरज विश्नोई यांचाही या प्रकरणात सहभाग आहे.
Tweet
'Bulli Bai' app case | Court sends accused Shweta Singh and Mayank into 14-day judicial custody: Sandeep Sherkhane, accused Mayank's lawyer https://t.co/7nr35s5ia0 pic.twitter.com/rpC0cNLxS1
— ANI (@ANI) January 14, 2022
आरोपी मयंकचे वकील संदीप शेरखाने यांनी सांगितले की, न्यायालयाने आरोपी श्वेता सिंग आणि मयंक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी श्वेता सिंग आणि मयंक यांची पोलीस कोठडी संपल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर श्वेताला कोर्टात हजर करण्यात आले तर मयंकची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने कोर्टात हजर राहू शकला नाही. (हे ही वाचा Sulli Deals 2.0: GitHub वर ‘Bulli Bai' अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना केले टार्गेट; पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रिय व्यक्तींचे फोटो सोशल मिडियावर शेअर)
या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक
याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. नीरज बिश्नोई, मयंक रावत, विशाल झा आणि 12वीची विद्यार्थिनी श्वेता सिंग अशी त्यांची नावे आहेत. मयंक रावत आणि श्वेता सिंग यांना उत्तराखंडमधून, 21 वर्षीय अभियंता विशाल कुमार झा यांना बंगळुरूमधून आणि नीरज बिश्नोई यांना आसाममधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरज बिश्नोई याला दिल्ली पोलिसांनी आसाममधून अटक केली होती. नीरजने पहिले ट्विटर हँडल बनवले होते.