Branded Clothes To Get Costlier: ब्रँडेड कपडे महागण्याची शक्यता, खरेदीपूर्वी 'या' गोष्टी घ्या जाणून
Pixabay (Representational photo)

जीएसटी कौन्सिलच्या (GST Counselling) मागील बैठकीत कपड्यांवरील कर वाढवण्याबाबत सहमती होऊ शकली नसली तरीही ब्रँडेड कपडे घालणे महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ, वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि इतर अनेक कारणांमुळे यंदा ब्रँडेड कपड्यांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढ होवु शकते. कापूस, धागा, फॅब्रिक यांसारख्या कच्च्या मालाची किंमत वाढत असल्याचे उद्योगाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे. पॅकेजिंग साहित्य आणि मालवाहतूक खर्च वाढला आहे. यामुळे नवीन वर्षात लोकांना ब्रँडेड कपडे घालण्यावर जास्त खर्च करावा लागू शकतो. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या किंमतींवर अवलंबून, 8-15 टक्के फरक असू शकतो. इंडियन टेरियन 8-10 टक्क्यांनी किमती वाढवू शकते.

अनेक ब्रँड्सनी किमती वाढवण्यास केली सुरुवात

अनेक ब्रँड्सनी किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. काही ब्रँड्स मार्च आणि एप्रिलपासून समर कलेक्शन सुरू करून किंमती वाढवण्याचा विचार करत आहेत. युवराज अरोरा, भागीदार, ऑक्टेव्ह अ‍ॅपेरल्स सांगतात की, कच्च्या मालात 70 ते 100 टक्के वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एमआरपी किमान 15-20 टक्क्यांनी वाढणार आहे. विंटर कलेक्शनसाठी एमआरपी आधीच 10 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. उन्हाळी कलेक्शनमध्ये किंमत 10 टक्क्यांनी अधिक वाढवली जाईल. Numero Uno देखील किंमती 5-10 टक्क्यांनी वाढवत आहे. मैडम उन्हाळ्याच्या कलेक्शनमध्ये कपड्यांच्या किमतीत 11-12 टक्क्यांनी वाढ करणार आहेत. (हे ही वाचा Jharkhand Shocker: दारुसाठी गर्भवती बायकोने नवऱ्याला पैसे देण्यास दिला नकार, संपातलेल्या व्यक्तीने गळा दाबून केली हत्या)

इंडस्ट्री असोसिएशन क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CMAI) च्या म्हणण्यानुसार या उन्हाळ्यात किमती सरासरी 15-20 टक्क्यांनी वाढतील. जीएसटी दर वाढीमुळे केवळ त्या ब्रँडच्या किमतींवर परिणाम होईल जे 1000 रुपयांपेक्षा कमी किंवा मूल्य विभागात वस्तू विकतात. असोसिएशनचे म्हणणे आहे की, जीएसटीचा दर वाढल्यास किमती आणखी 7-10 टक्क्यांनी वाढू शकतात.

भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा

कच्च्या मालाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, असे कापड उत्पादकांचे म्हणणे आहे. जागतिक किमती आणि मागणीच्या अनुषंगाने देशातील कापसाची किंमत वाढत आहे. चीनवर पाश्चिमात्य निर्बंधांमुळे भारताकडून कापसाची मागणी वाढली आहे. निर्यात बाजारात काम करणाऱ्या कंपन्यांनी आपला बहुतांश साठा निर्यात बाजारात चांगला भाव मिळत असल्याने निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.