Bihar Political Crisis: नितीश कुमार सरकारमध्ये भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
Samrat Chaudhary and Vijay Sinha (PC - X/@ians_india)

Bihar Political Crisis: नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी बिहार (Bihar) चे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता राज्यात भाजप (BJP)चे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. भाजप नेते सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा (Vijay Sinha) हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बिहारच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भाजप, जेडी(यू) आणि इतर मित्रपक्षांसह राज्यात एनडीए सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विधीमंडळ पक्षनेतेपदी सम्राट चौधरी यांची तर उपनेतेपदी विजय सिन्हा यांची निवड करण्यात आली. आज नितीश कुमार यांच्या राजीनाम्यापूर्वी भाजपने पुष्टी केली की, ते कुमार यांच्या JD(U) आणि इतर मित्रपक्षांसोबत राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. (हेही वाचा -Bihar Political Crisis: बिहार मध्ये आज Nitish Kumar पुन्हा मुख्यमंत्री आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री होणार शपथबद्ध - सूत्र)

भाजपने माझ्या आयुष्यात एक ऐतिहासिक गोष्ट घडवून आणली. विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड होणे आणि सरकारचा भाग असणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे, अशी भावना सम्राट चौधरी यांनी व्यक्त केली आहे. बिहारच्या विकासासाठी आणि लालू यादवांची दहशत संपवण्यासाठी 2020 मध्ये आम्हाला मिळालेला जनादेश - बिहारमध्ये जंगलराज नसावे यासाठी भाजपला नितीश कुमारांकडून प्रस्ताव आला, तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असं चौधरी म्हणाले. (हेही वाचा -Nitish Kumar यांची INDIA आघाडी मधून बाहेर पडल्याची घोषणा; महाआघाडीत 'बिघाडी' मुळे राजीनामा दिल्याची माहिती)

नितीश पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याच्या अटकळानंतर काही दिवसांनी आज राज्यातील 'महागठबंधन' शासन संपुष्टात आले. रविवारी राजभवनात नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना आम्ही राज्यातील 'महागठबंधन'शी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.