पंजाबमध्ये (Punjab) रस्त्याने प्रवास करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उड्डाणपुलावर 15 ते 20 मिनिटे अडकून पडल्याच्या घटनेने आता जोर पकडला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चुक झाल्याप्रकरणी गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला सुनावल आहे. तसेच, पंजाबचे मुंख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यामध्ये सुरक्षेची कोणतीही त्रुटी नव्हती, पण दौरा रद्द करण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला असं सांगत त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. भटिंडा ते फिरोजपूर हा रस्त्याने प्रवास करणे हा पंतप्रधानांचा शेवटचा निर्णय होता. चन्नी म्हणाले, सुरुवातीला विमानाने प्रवास करायचा होता, पण प्रवासाचा प्लॅन बदलला तसेच, भाजप राजकीय कारणांसाठी पंजाब सरकारवर आरोप करत आहे.
Tweet
We had asked them (PMO) to discontinue the visit due to bad weather conditions & protests. We had no information of his (Prime Minister Narendra Modi) sudden route change. There was no security lapse during the PM visit: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/TYxRlNL5lt
— ANI (@ANI) January 5, 2022
सुरक्षेची जबाबदारी पंजाब सरकारची होती.
निवेदनानुसार, गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांना रसद, सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी लागली. त्यात असेही म्हटले आहे की आकस्मिक योजना लक्षात घेता, पंजाब सरकारला रस्त्याने कोणतीही हालचाल सुरक्षित करण्यासाठी आणि रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करावी लागली. परंतु असे घडले नाही, कारण कोणतीही तैनाती केली गेली नाही. (हे ही वाचा PM Narendra Modi Convoy Stuck on Flyover: फ्लायओव्हरवर अडकले पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा यंत्रणेकडून चूक; पंजाबमधील रॅलीही रद्द.)
सुरक्षेतील त्रुटींबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला
मंत्रालयाने सांगितले की, या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परतण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही पंजाब सरकारला सांगण्यात आले आहे.