PM Narendra Modi's convoy | (Photo Credit - Twitter)

फ्लायओव्हरवर जवळपास 15 ते 20 मिनीटे अडकून पडावे लागल्यामुळे पंतप्रधा नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आपला पंजाब दौरा रद्द केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा दौऱ्यात चूक (PM Narendra Modi's Security Lapse) राहिल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने पंजाब (Punjab) सरकारला जबाबदार धरले आहे. आंदोलकांमुळे पंतप्रधानांनाचा ताफा थांबविण्यात आला. त्यामुळे फिरोजपूर (Ferozepur) येथील कार्यक्रमात सहभाग न घेताच पंतप्रधान मोदी बठिंडा विमानतळावर परतले. राष्ट्रीय शहीद स्मारकास भेट देण्यासाठी पंतप्रधान बठिंडा येथे पोहोचले होते. त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी घेऊन जाण्यात येणार होते. मात्र, पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना 20 मिनीटे वाट पाहावी लागली.

गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रदीर्घ काळ वाट पाहूनही परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे त्यांना रस्तेप्रवासाने राष्ट्रीय शहीद स्मारक स्थळी नेण्याचा निर्णय झाला. यात दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता. डीजीपी पंजाब पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेची योग्यती खात्री करुन घेतल्यानंतर त्यांचा ताफा पुढे निघाला.

स्मारकापासून सुमारे 30 किलोमीटर दूर एका फ्लायओव्हरपर्यंत पंतप्रदानांचा ताफा पोहोचला तेव्हा आंदोलकांनी पूर्ण रस्ताच बंद करुन ठेवला होता. गृह मंत्रालयाने म्हटले की, 'पंतप्रधान 15 ते 20 मिनीटे फ्लायओव्हरवर अडकून पडले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत घडलेली ही मठी चूक होती.'