Chhattisgarh Encounter | Representative Image (Photo Credits: File Image)

Bijapur Encounter Update: छत्तीसगडमधील विजापूर येथे रविवारी केलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत जवळपास  ३१ माओवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा दलआणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी ठार करण्यात आले होते. या कारवाईदरम्यान पोलिसांनी या भागातून शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त केली आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. दोन्ही जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी जंगलात चकमक झाली. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले की, विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरात झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत जिल्हा राखीव दलाचा (डीआरजी) एक आणि स्पेशल टास्क फोर्सचा (एसटीएफ) एक जवान शहीद झाला, तर दोन जवान जखमी झाले. हेही वाचा: Ghaziabad Shocker: फोन उचलला नाही म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल

बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी जंगलात चकमक झाली. छत्तीसगडच्या विजापूरमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी आणि 2 सुरक्षा रक्षक ठार झाले आहेत.

या चकमकीत शहीद झालेले जवान जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि विशेष कृती दलाचे (एसटीएफ) होते, अशी माहिती बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी माहिती दिली आहे.