Credit-(X,@iamsunilgautamm)

Ghaziabad Shocker: गाझियाबादमध्ये Zomato डिलिव्हरी पार्टनरच्या गुंडगिरीचे प्रकरण समोर आले आहे. नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गढी गावात राहणाऱ्या आधार चौधरीने झोमॅटोवरून जेवण मागवले होते. डिलिव्हरी पार्टनर निशांत जेवण घेऊन आला तेव्हा ग्राहक फोनवर व्यस्त होता. बराच वेळ वाट पाहिल्याने संतापलेल्या निशांतची आधारशी बाचाबाची झाली. झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात चांगलाच वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की, डिलिव्हरी बॉयने त्याच्या साथीदारांसह ग्राहकांच्या घरावर गोळीबार केला आणि वाहनांची तोडफोड केली. डिलिव्हरी बॉयने जेवण आणले तेव्हा घरमालक फोनवर कॉलवर व्यस्त होता. कॉल उचलला नाही म्हणून डिलिव्हरी बॉय संतापला. डिलिव्हरी बॉयने त्याच्या गावातील सुमारे अर्धा डझन लोकांना बोलावून घरावर गोळीबार केला. घरात उपस्थित असलेल्या दोघांना मारहाण केली. याशिवाय घरामध्ये उभी असलेली स्कॉर्पिओ कार व दुचाकीही फोडली. दरम्यान, गोळीबाराची हि  घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ @iamsunilgautamm नावाच्या हँडलने 'X' सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हेही वाचा: Zomato Board कडून कंपनीचं नाव Eternal करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

येथे पाहा, घटनेचा व्हिडीओ: 

आरोपीला अटक

पोलिसांनी आरोपीला अटक केली या घटनेनंतर मारामारीत जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपींनी घरात उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ कारची तोडफोड केली आणि दुचाकीचीही तोडफोड केली. या घटनेनंतर पोलिसांनी ग्राहक आधार चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एसीपी नंदग्राम पूनम मिश्रा यांनी सांगितले.