विषारी दारू (Spurious Liquor) प्यायल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बिहारच्या (Bihar) चांपरणच्या (Champaran) देवरिया (Deoria) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृतांवर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. तर, सरकारी आणि खाजगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात विषारी दारु पुरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चंपारण उपनिरीक्षक ललन मोहन प्रसाद यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.
याप्रकरणी चांपरण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणाले की, देवरवा येथील परिसरात एक व्यक्ती दारू बनवतो. ही दारू प्यायल्याने परिसरातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आम्ही काही जणांना अटक केली आहे. तसेच खबरदारी म्हणून परिसरात वैद्यकीय सज्ज केले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा-बलात्कार होण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने केला खून; तामिळनाडू पोलिसांनी आत्मरक्षणाचा गुन्हा दाखल करत महिलेला दिले सोडून
एएनआयचे ट्वीट-
बिहार: चंपारण में जहरीली शराब पीने से 8 लोगों की मृत्यु का मामला सामने आया।
ज़िलाधिकारी ने बताया, "हमें जांच में पता चला कि गांव में एक व्यक्ति शराब बनाता है। हमने कुछ गिरफ़्तारी भी की हैं। हमने वहां मेडिकल टीमें लगा दी हैं। मामले में जांच जारी है।" pic.twitter.com/M9m5K9gp35
— ANI_HindiNews (@AHindinews) July 16, 2021
मृतांमध्ये देवरियाचा बीकाऊ मियां, लतीफ साह, रामवृक्ष चौधरी, बाळूईचा नईम हजम, सीतापूरचा भगवान पांडा, जोगियाचा सुरेश साह, बागहीचा रतुल मियां आणि गोहीचा झुन्ना मियां यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जीएमएचमध्ये टेलपूरच्या इझार मियांवर उपचार सुरू आहेत. देवरियाच्या मुमताज अन्सारी यांच्यासह अनेकांवर रामनगर, बेतिया आणि इतर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.