हरियाणातून (Haryana) राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election Result 2022) 'क्रॉस व्होटिंग' (Cross Voting ) केल्याचा आरोप करत काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी शनिवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांना पक्षाच्या सर्व पदांवरून हटवले. राज्यसभा निवडणुकीत अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर कुलदीप यांच्यावर कारवाई होणार असल्याचे मानले जात होते. यापूर्वी कुलदीप हे पक्षावर नाराज होते. या सर्व कारणांमुळे काँग्रेसने आमदार कुलदीप बिश्नोई यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी बिश्नोई यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यासह पक्षाच्या जबाबदाऱ्यांवरून तत्काळ प्रभावाने मुक्त केले. बिश्नोई यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारसही काँग्रेस हरियाणा विधानसभेच्या अध्यक्षांकडे करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Tweet
Congress expels party MLA Kuldeep Bishnoi from all his present party positions, with immediate effect.
Bishnoi had earlier cross-voted in Rajya Sabha polls in Haryana. pic.twitter.com/tjPdWyXAEi
— ANI (@ANI) June 11, 2022
दुसरीकडे, हरियाणातून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्विट केले की, ‘माझ्याकडे फणा चिरडण्याचे कौशल्य आहे, मी सापांच्या भीतीने जंगल सोडत नाही. शुभ प्रभात. (हे देखील वाचा: Rajasthan: राज्यसभा निवडणुकीत Congress चा दणदणीत विजय, जिंकल्या 4 पैकी 3 जागा)
राज्यसभा निवडणुकीत माकन यांच्या पराभवानंतर हरियाणा प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंह यादव यांनीही एक ट्विट करून माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा आणि त्यांचे खासदार पुत्र दीपेंद्र हुड्डा यांच्यावर निशाणा साधल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर आपण हुड्डा कुटुंबाकडे बोट दाखवत नसल्याचे स्पष्ट केले.