Nasal Covid Vaccine: भारत बायोटेक (Bharat Biotech) ने नाकाद्वारे (Nasal Vaccine) देण्यात येणाऱ्या कोरोना लस (Covid Vaccine) नॅक्सिनची क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे. फार्मास्युटिकल कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. कृष्णा एला यांनी रविवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे सबमिट करू. जर सर्व काही ठीक झाले, तर आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल. ही जगातील पहिली वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली नाकातील कोरोना लस असेल."
औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या विषय तज्ञ समितीने (SEC) भारत बायोटेकला तिच्या इंट्रानोसल कोविड लसीसाठी फेज-III बूस्टर डोस स्टडीसाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे. (हेही वाचा - COVID-19 Vaccination: Corbevax ला कोरोना बूस्टर डोस म्हणून मंजूर; DCGI ने दिला ग्रीन सिग्नल)
ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने या वर्षी जानेवारीमध्ये भारत बायोटेकला अनुनासिक कोरोना लसीवर तिसऱ्या स्टँडअलोन फेज चाचणीसाठी परवानगी दिली आहे. एमडी डॉ. कृष्णा एला यांनी पुढे सांगितलं की, लसीचा बूस्टर डोस रोग प्रतिकारशक्ती देतो. बूस्टर डोस हा लसीकरण करणाऱ्या प्रत्येकासाठी एक चमत्कारिक डोस आहे. लहान मुलांच्या बाबतीतही पहिला आणि दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती देतो, परंतु तिसरा डोस आणखी प्रभावी आहे आणि प्रतिकारशक्ती प्रदान करतो. तिसरा डोस प्रौढांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. कोरोना 100 टक्के हद्दपार होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत जगावे लागेल.
ओमिक्रॉनवर इंट्रानासल लस अधिक प्रभावी -
तिसऱ्या डोसच्या फेज III चाचण्यांसाठी अर्ज सादर करणारी भारत बायोटेक ही देशातील दुसरी कंपनी आहे. इंट्रानासल लसींमध्ये ओमिक्रॉन सारख्या नवीन COVID-19 प्रकारांचा प्रसार रोखण्याची क्षमता आहे. भारताने देशात लसीकरणासाठी कोविशील्ड, कोवॅक्सीन आणि स्पुतनिक V ला मान्यता दिली आहे.