Bank of Baroda: मास्क घातला नाही म्हणून ग्राहकाला झाडली गोळी, बॅंक ऑफ बडोदाच्या सुरक्षा रक्षकाला अटक
Shooting | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) येथील बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) क्षेत्रीय कार्यालयात शुक्रवारी सर्वांना हादरून टाकणारी घटना घडली आहे. मास्क न घालता बँकेत आलेल्या एका ग्राहकाला सुरक्षा रक्षकाने गोळी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. यात संबंधित ग्राहक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

राजेश कुमार राठोड (वय,35) असे ग्राहकांचे नाव आहे. राजेश हा बरेली जंक्शन जवळील उत्तर रेल्वे कॉलनीत वास्तव्यास असून दूरसंचार सहाय्यक आहे. तर, केशव कुमार असे बॅंक ऑफ बडोदाच्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश शुक्रवारी सकाळी सिव्हिल लाइन्स येथील बँक ऑफ बडोदाच्या प्रादेशिक कार्यालयात गेले होते. तो मास्क न घालताच कार्यालयात गेला. त्यावेळी केशव कुमार यांनी त्याला विरोध दर्शवला. ज्यामुळे त्यांच्यात वाद पेटला. याचदरम्यान, केशवने आपल्या जवळ असलेल्या बंदूकीने राजेश यांना गोळी झाडली. ज्यात राजेश गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे देखील वाचा- Chennai SBI ATMs: तांत्रिक अडचणींचा फायदा घेत एसबीआय एटीएम्समधून 48 लाख रुपयांची चोरी

या घटनेनंतर बॅंकेतील अधिकारी आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.