Chennai SBI ATMs: तांत्रिक अडचणींचा फायदा घेत एसबीआय एटीएम्समधून 48 लाख रुपयांची चोरी
State Bank of India (Photo Credits: PTI)

भारतातील सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) एटीएमममधून तांत्रिक अडचणीचा फायदा घेत तब्बल 48 लाख रुपये चोरुन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. कैश डिपॉजिट मशीन (CDM) च्या माध्यमातून ही घटना तामिळनाडू राज्यातील वेलचेरी (Velachery), थरमानी (Tharamani), विरुगंबक्कम (Virugambakkam), आणि चेन्नईमधील (Chennai) इतर अनेक ठिकाणी घडली. या घटनेनंतर एसबीआय प्रशासनाने कारवाई करत संपूर्ण तामिळनाडू राज्यातील एटीएम व्यवहार स्थगित केले आहेत. 48 लाख रुपयांची चोरी झाल्यानंतर एसबीआयने (SBI) ही कारवाई केली आहे. तामिळनाडूमध्ये आता एसबीआय ग्राहकांना एटीएम- कॅश डिपॉझिट मशीन (CDM) आदी माध्यमांतून पैसे काढता येणार नाहीत. कारण, सुरक्षेचा उपाय म्हणून बँकेने ही कारवाई केली आहे.

तामिळनाडूतील एटीएम सेंटर बाहेर पोस्टर दिसत होते की, कॅश डिपॉझिट मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा तांत्रिक कारणांमुळे काही काळासाठी बंद आहे. एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक आर. राधाकृष्णन यांनी म्हटले की, यापुढेही या चोरीसारखी घटना घडू नये यासाठी आम्ही सर्व एटीएम व्यवहार स्थगित केले आहेत. सध्यास्थितीत एसबीआयचे एकही मशीन पैसे देऊ शकणार नाही. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

धक्कादायक असे की चोरांनी केवळ एकाच प्रकारच्या कॅश डिपॉझिट मशीनमधून चोरी केली नाही. यात वेगवेगळ्या मशीनचा समावेश आहे. चोरांना पकडण्यासाठी एडिशनल कमिशनर एन कण्णन यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. दरम्यान, चोरांनी चेन्नईतील एसबीआयच्या वेगवेगळ्या एटीएममध्ये घुसून कॅश डिपॉझिट मशीनमधून मोठ्या धाडसी आणि हुशारीने 48 लाख रुपयांपेक्ष अधिक रोख रक्कम चोरली आहे.