Dombivli Crime: भिंत फोडून लाखो रुपयांच्या दागिन्यांची केली चोरी, डोबिंवलतील घटना

डोंबिवलीत गुन्हेगांरांची वाढते प्रमाण पाहून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण होत चालले आहे. डोंबिवलीत चक्का एका चोरट्यांनी हद्दच पार केली.

Dombivli Crime: भिंत फोडून लाखो रुपयांच्या दागिन्यांची केली चोरी, डोबिंवलतील घटना
Thief | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Dombivli Crime: डोंबिवलीत दिवसेंदिवस गुन्हेगांरांची वाढताना दिसत आहे. हे पाहून  सर्व सामान्यांच्या मनात धास्ती भरली आहे. शहरात चोरट्यांची दहशत वाढत चालली आहे. दरम्यान डोंबिवलीत चक्का एका चोरट्याने हद्दच पार केली. दागिन्यांच्या दुकानाची भिंत फोडून चोरी केली. दुकानात असलेले सोने आणि चांदीचे 76 लाखांचे दागिने चोरांनी चोरी केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही चोरी करण्यासाठी चोरट्याने आधीच प्लान बनवला होता. कारण दागिन्यांच्या दुकानामध्ये चोरी करण्यासाठी त्यांनी आधी शेजारचं दुकान भाड्याने घेतले होते. हे पोलिसांच्या निर्देशात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानातून ज्वेलरी शॉपच्या भिंतीला मोठं भगदाड पाडून चोरटे आत घुसले आणि त्यांनी तब्बल 76 लाख रुपयांचे दागिने चोरून फरार झाले. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळे पथक बनवले आणि तपास सुरु केला आहे.डोंबिवलीत या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहे. (हेही वाचा- कोल्हापुरात 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी, चोरांकडून पाऊस आणि अंधारांचा घेतला फायदा)

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महात्मा फुले रोड येथे रत्नसागर ज्वेलर्स नावाचे दुकाना आहे. या दुकानात 28 नोव्हेंबरला चोरीची घटना घडली. चोरट्यांनी बरोबर दुकानाच्या बाजूला एक दुकान उघडलं. . चोरट्यांनी पलीकडच्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडले आणि ते आत शिरले. त्यानंतर दुकानाच्या डिस्प्ले काऊंटरला लावलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. तसेच दुकानातील तिजोरीही फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती तोडण्यात चोरांना अपयश मिळाले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2023 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).