Ballia Rape Case: उत्तर प्रदेशातील बलिया शहरातील कोतवाली परिसरात पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सहा वर्षांच्या मुलासह तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, बलिया शहरातील कोतवाली परिसरात फिर्यादीच्या घरात राहणाऱ्या दोन भाडेकरूंतील तीन मुलांनी बुधवारी सायंकाळी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले की, आरोपीचे वय सहा वर्षे, १३ वर्षे आणि १६ वर्षे आहे. कोतवालीचे प्रभारी योगेंद्र बहादूर सिंह यांनी शनिवारी सांगितले की, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Salman Khan Buys New Bulletproof SUV: लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांनंतर सलमान खानने आपल्या सुरक्षेसाठी खर्च केले करोडो रुपये; दुबईहून खरेदी केली नवीन बुलेटप्रूफ कार
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस त्यांची कसून चौकशी करत असून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.