
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders, IPL 2025 68th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामात, चार संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या हंगामातील 68 वा सामना आज म्हणजेच 25 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ या हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!#SRH register #TATAIPL's third-highest total courtesy of Heinrich Klaasen's blazing ton! 🧡
Will #KKR chase it down and rewrite history?
Scorecard ▶ https://t.co/4Veibn1bOs #TATAIPL | #SRHvKKR pic.twitter.com/zxPKCjDII8
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांची सुरुवात स्फोटक झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि एकूण 92 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत तीन गडी गमावून 278 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने नाबाद 105 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, हेनरिक क्लासेनने 39 चेंडूत सात चौकार आणि नऊ षटकार मारले. हेनरिक क्लासेन व्यतिरिक्त, ट्रॅव्हिस हेडने 76 धावा केल्या.
दुसरीकडे, सुनील नारायणने कोलकाता नाईट रायडर्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. सुनील नारायण व्यतिरिक्त वैभव अरोराने एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 20 षटकांत 279 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.