Delhi Fire: दिल्लीत औद्योगिक क्षेत्रात कारखान्याला लागली आग; 17 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल (Video)
सेक्टर-2 मधील जे-10 कारखान्यात लागलेली आग विझवण्यासाठी 17 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे भिंतीचा एक भाग कोसळला.
Delhi Fire: दिल्लीतील बवाना औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात आज सकाळी भीषण आग(fire breaks out in a factory) लागली. सेक्टर-2 मधील जे-10 कारखान्यात लागलेली आग विझवण्यासाठी 17 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे भिंतीचा एक भाग कोसळला. तथापि, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 17 अग्निशमन गाड्या (Fire Tenders) घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारखान्यात आग लागल्यानंतर मोठा स्फोट झाला. ज्यामुळे इमारतीचा एक भाग कोसळला.
17 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल
Delhi: A massive fire breaks out in a factory at Bawana Industrial Area. Around 18 fire tenders rushed to the spot. A blast reportedly led to the sudden collapse of the factory pic.twitter.com/QYmkvqx8Wb
— IANS (@ians_india) May 24, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2025 08:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

