बलदेव कुमार , इम्रान खान ( फाईल फोटो)

इम्रान खान (Imran Khan) यांच्या पीटीआय पक्षाचे आमदार बलदेव कुमार (Baldev Kumar) यांच्याकडून भारताकडे (India) आश्रयाची मागणी केली आहे. पाकिस्तानमधील (Pakistan) भारतीय नागरीक सुरक्षित नसून तेथील नेत्यांच्या मनमानीमुळे नागरिकांचे जीवन दुर्मिळ झाले आहेत. अशा नागरिकांना भारताने आश्रय दिला पाहिजे, अशी मागणी बलदेव कुमार यांनी केली आहे. पाकिस्तानात राहणाऱ्या अल्पसंख्यी लोकांवर अत्याचार होत आहेत. सध्या बलदेव कुमार भारतात आहेत आणि त्यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे.

बलदेव कुमार खैबर पख्तून ख्वा प्रांतातील बारिकोट आरक्षित जागेचे आमदार होते. एका वृत्तसंस्थेला माहिती देताना बलदेव म्हणाले की, पाकिस्तानची परिस्थिती खराब आहे. पाकिस्तानच्या नेत्यांच्या मनमानीमुळे अनेक नागरिकांचे जीवन दुर्मीळ झाले आहेत. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानातील अल्पसंख्यी लोकांवर अत्याचार होत आहेत. सध्या बलदेव कुमार पंजाब येथे आहेत. तसेच भारत सोडून पाकिस्तानात जाण्यास त्यांनी नकार दिला आहे. पाकिस्तानातील हिंदू शिख सुरक्षित नाहीत. पाकिस्तानात त्यांच्यावर मोठा अत्याचार होत आहे. तेथील नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे, असेही बलदेव कुमार म्हणाले आहेत. बलदेव कुमारसह त्यांची पत्नी २ मुले आणि मुलगी आहे की, जे भारताकडे आश्रयाची मागणी करत आहेत. हे देखील वाचा- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव घटला, मी त्यांची मदत करु इच्छितो-डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तानविरोधात देशात संताप सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये (Kashmir) दंगलीच्या वेळी स्वातंत्र्य मिळविणार्‍या 22 समर्थकांना अटक करण्यात आली आहे. काश्मिरमधील मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्याचे बोलणारा पाकिस्तान स्वत: मानवी हक्कांसाठी किती गंभीर आहे, याचा अंदाज लावता येऊ शकतो.