 
                                                                 Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांचा अंतरिम जामिन वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)धाव घेतली आहे. आरोग्याच्या काही तपासण्या करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशा मागणी संदर्भातील याचिका केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ‘इंडिया टुडे’ ने त्याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा:Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला होता. 10 मे रोजी अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाली होती. केजरीवाल यांचा अंतरिम जामीन 1 जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यांच्या एका दिवसानंतर म्हणजे २ जून रोजी त्यांना पुन्हा तुरुंग प्रशासनासमोर हजर रहावे लागणार आहे. परंतु केजरीवाल यांनी त्यांच्या वैज्यकीय तपासण्या राहिल्या असल्याचं कारण देत 7 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशा मागणी संदर्भातील याचिका केली आहे. यात पीईटी-सीटी स्कॅन आणि इतर वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असणार आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी 21 मार्च, 2024 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. तुरुंगात त्यांची तब्येत खालावली होती. त्यावर आप कायकर्त्यांनी जोरदार आवाज उठवला होता. पत्रकार परिषदेतून आप कायकर्त्यांनीभाजप आणि पंतप्रधान मोंदींवर गंभीर आरोप केले होते.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
