 
                                                                 Tamil Nadu School Assault: तमिळनाडूतील एका शाळेत पीटी शिक्षकाने(Physical Education Teacher) फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्याला खराब कामगिरीमुळे बेदम मारहाण(Tamil Nadu School Assault) केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला खेळाच्या मैदानातच कानशिलात लगावत लाथांनी मारहाण केली. याघटनेची सध्या जोरदार चर्चा आहे. व्हिडीओही व्हायरल झाला आहे. हे प्रकरण बाहेर येताच शाळा प्रशासनाने शिक्षकाला निलंबीत केले आहे. अण्णामलाई असे मारहाण केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. (हेही वाचा: Viral Video: शाळेत गोंधळ! आग्रामध्ये प्राचार्य आणि महिला शिक्षकांमध्ये जोरदार भांडण, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल)
तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील मेत्तूर जवळील सरकारी अनुदानित शाळेत ही घटना घडली. शाळेत फुटबॉल स्पर्धा सुरू होती. त्यादरम्यान खेळाडूंच्या संघाने खराब कामगिरी केली. त्यामुळे शिक्षक नाराज होता. अण्णामलाई या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले.घटनेमध्ये, शिक्षक विद्यार्थ्यांवर हल्ला करताना दिसला, विद्यार्थी टीम जर्सी आणि फुटबॉलचे बूट घालून जमिनीवर बसला होता. त्यावेळी शिक्षक त्याच्याजवळ जातो. विद्यार्थ्याचे केस ओढले आणि मारहाण केली. (हेही वाचा: UP Shocker: शाळेतील 15 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाला अटक, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल)
'तू मुलगा आहेस की मुलगी? तुम्ही त्याला गोल कसे करू देऊ शकता,' असे बोलताना दिसत आहे. 'तुम्ही चेंडूला तुमच्यासमोरून कसे जाऊ दिले? तुम्ही दबावाखाली खेळू शकत नाही का? तुमच्यात संवाद का नव्हता?''असे नेक प्रश्न विद्यार्थ्याला केले. जिल्हा शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
