Viral Video: शाळेत गोंधळ! आग्रामध्ये प्राचार्य आणि महिला शिक्षकांमध्ये जोरदार भांडण, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत महिला मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यात जोरदार मारामारी झाली. असे सांगितले जात आहे की ,जेव्हा शिक्षिका शाळेत उशिरा आली तेव्हा मुख्याध्यापकांनी तिला अडवले, यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे शाळा प्रशासनाला अपमानास्पद वाटत आहे.

व्हायरल Shreya Varke|
Viral Video: शाळेत गोंधळ! आग्रामध्ये प्राचार्य आणि महिला शिक्षकांमध्ये जोरदार भांडण, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
Agra Principal Teacher Fight

Viral Video: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत महिला मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यात जोरदार मारामारी झाली. असे सांगितले जात आहे की ,जेव्हा शिक्षिका शाळेत उशिरा आली तेव्हा मुख्याध्यापकांनी तिला अडवले, यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे शाळा प्रशासनाला अपमानास्पद वाटत आहे.

 दोन्ही महिला एकमेकांचे केस ओढत असून एकमेकांना लाथा-बुक्के मारत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तेथे उपस्थित इतर शिक्षक व कर्मचारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसले, मात्र दोघांचाही संयम सुटला होता. या घटनेने शाळेतील वातावरण तणावपूर्ण बनले असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
पाहा व्हिडीओ: 

याप्रकरणी शाळा प्रशासनाकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. शिक्षक उशिरा का शाळेत पोहोचले हेही समजू शकलेले नाही. मात्र या घटनेने पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शाळांमध्ये शिस्त पाळण्याची गरज व्यक्त केली आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel