UP Shocker: शाळेतील 15 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाला अटक, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

शहाजहानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणाले, ‘सर्व मुली 12 ते 15 वयोगटातील असल्याने हे आरोप गंभीर आहेत. या सर्व मुलींनी आरोपी शिक्षकाविरुद्ध त्यांचे जबाब दिले आहेत. याबाबत तिल्हारचे सर्कल ऑफिसर प्रियांक जैन तपास करत आहेत.'

UP Shocker: शाळेतील 15 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाला अटक, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी शाळेतील संगणक शिक्षकाला अटक करण्यात आली आहे, तर शाळेतील मुख्याध्यापक आणि एका सहाय्यक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहजहांपूर जिल्ह्यातील तिल्हार गावातील एका सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. आरोपी संगणक शिक्षकाला 15 मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यातील बहुतांश मुली दलित आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

या सर्व मुली अल्पवयीन असून त्या इयत्ता सातवी आणि आठवीमध्ये शिकतात. आरोपी संगणक शिक्षकाला पाठीशी घातल्याच्या आरोपाखाली मुख्याध्यापक व एका सहाय्यक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांवरही कलम 354 (महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न), 352 आणि 120बी (गुन्हेगारी कट) या कलमांसह पोक्सो कायदा आणि अनुसूचित जातीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूलभूत शिक्षा अधिकारी, कुमार गौरव म्हणाले, ‘मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.’ या सर्व मुलींचे जबाब पोलिसांनी पालकांच्या उपस्थितीत नोंदवून घेतल्यानंतर रविवारी संगणक शिक्षकाची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर मुलींना वैद्यकीय-कायदेशीर तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

विद्यार्थिनींनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा शिक्षक त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करत असे. एका मुलीने तिच्या वडिलांना सांगितले की, तिचा 30 वर्षीय संगणक शिक्षक शाळेच्या वेळेनंतर तिला आणि इतर विद्यार्थिनींना अयोग्यरित्या स्पर्श करतो, तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यानंतर या मुलींच्या पालकांनी शाळेवर छापा टाकला. त्यावेळी शाळेच्या टॉयलेटमधून वापरलेले कंडोमही आढळले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि शाळेचे मुख्याध्यापक, संगणक शिक्षक आणि एका सहाय्यक शिक्षकाविरुद्ध तिल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (हेही वाचा: Serial killer's Shocking Story: ड्रग्ज घेऊन, पॉर्न पाहून करत असे मुलांची शिकार; 30 जणांवर बलात्कार करून केली हत्या, न्यायालयाने ठरवले दोषी)

शहाजहानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणाले, ‘सर्व मुली 12 ते 15 वयोगटातील असल्याने हे आरोप गंभीर आहेत. या सर्व मुलींनी आरोपी शिक्षकाविरुद्ध त्यांचे जबाब दिले आहेत. याबाबत तिल्हारचे सर्कल ऑफिसर प्रियांक जैन तपास करत आहेत. याबाबत आणखी दोन शिक्षकांच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2023 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).