Amit Shah's Twitter Account Issue: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विटर अकाउंट Restore केल्यानंतर Twitter ने दिले 'हे' स्पष्टीकरण
Amit Shah's Twitter Account Issue (Photo Credits: ANI)

Amit Shah's Twitter Account Issue: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटरवरील अकाउंटच्या डीपीमध्ये अचानक झालेला बदल पाहता सर्वजणांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कारण त्यांचा प्रोफाइल फोटो काही वेळासाठी गायब झाला होता. कारण अमित शहा यांचा जो फोटो डीपीवर होतो तो कॉपीराइट असल्याचा कोणीतरी दावा केला गेला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा प्रोफाइल फोटो रिस्टोर करण्यात आला होता. यावर आता ट्विटरकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.(Rahul Gandhi On PM Modi:भारताची ताकद मोदींच्या कमजोरीत बदलली आहे- राहुल गांधी)

ट्विटरने अमित शहा यांच्या ट्विटर अकाउंटबद्दल असे म्हटले आहे की, आमच्या काही जागतिक पॉलिसीनुसार त्यांच्या अकाउंटवर Inadvertent error येत होता. त्यामुळे अकाउंट तात्पुरते लॉक करण्यात आले होते. मात्र काही वेळानंतर ही समस्या पूर्ववत होत त्यांच्या अकाउंटवरील फोटो रिस्टोर करण्यात आल्याचे ट्विटरच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे.(कधी होणार PM Narendra Modi आणि Joe Biden यांच्यामध्ये संभाषण? परराष्ट्र मंत्रालयाने दिले उत्तर)

दरम्यान, ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्सची संख्या असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 23.6 मिलियन फॉलोअर्स असून अमित शहा यांच्या सुद्धा फॉलोअर्सची संख्या ही अधिक आहे.