Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

Gujarat Lok Sabha Election 2024: देशातील लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढती तर खूप आहेत पण त्या सर्व लढतीतील गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघाचीही निवडणूक आहे. इथे भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट मुकाबला होतो आहे. इतिहास रचत अमित शाह 2 लाख मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाकडून केंद्रीय मंत्री आणि गृहमंत्री अमित शाह निवडणूक मैदानात उतरले आहेत तर काँग्रेस पक्षांने सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election Results 2024: वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिघाडीवर, अजय राय आघाडीवर)

गुजरातमधील 26 पैकी 25 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाल्यामुळे, गृहमंत्री अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून दोन लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भाजपसाठी महत्त्वपूर्ण आघाडीचा अंदाज येण्यासाठी चांगलीबाब आहे. पोरबंदरमधून आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आघाडीवर आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पक्ष 22 जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे.