भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.B. R. Ambedkar) आज जिवंत असते तर ते भाजपात (BJP) असते असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशातील प्रशासकीय अधिकारी लालजी प्रसाद निर्मल (Lalji Prasad Nirmal) यांनी केले आहे. तर दलित समाजासाठी उत्तर प्रदेशात सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेताना त्यांनी हे विधान केले आहे.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने दलितांसाठी विविध योजना सुरु केल्या असल्याचा दावा लालजी प्रसाद निर्मल यांनी केला आहे. तसेच आजवर आलेल्या कोणत्याही सरकारने दलितांसाठी काही केले नाही. मात्र सरकार कडून चालू वर्षात एकूण 138 कोटी रुपये देण्यात आले असल्याचे लालजी प्रसाद यांनी उत्तर प्रदेशीतील एका कार्यक्रमवेळी म्हणाले आहेत. एढच नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर ते भाजपमध्ये असते असे ही विधान यावेळी त्यांनी केले आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी त्यांची कामगिरी पाहूनच पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही लालजी यांनी भाजप सरकार आणि योगी आदित्यनाथ यांची बाजू मांडत ते दलितांचे राम असल्याचे ही विधान केले होते. तर एप्रिल महिन्यामध्ये योगी आदित्यनाथ यांना दलित मित्र पुरस्काराने गौरवण्यातआले होते.