Uttar Pradesh Shocker: अजब प्रेम की गजब कहाणी, पहिल्याचं नजरेत सासू सोबत जडलं प्रेम, शारिरीक संबंधासाठी सूनेकडून दबाव
love at first sight with mother-in-law PC TWITTER

Uttar Pradesh Shocker: प्रेम हे कोणाला सांगून होत नाही. कधी, कसा, कोणावर होईल याचा नेम नसतो. समोरच्या व्यक्तीच्या वागणूक आणि विचार जेव्हा पटू लागते तेव्हा प्रेम होत जात तर कधी कधीत पहिल्याच नजरेत प्रेम होत. प्रेमाला वय, जात, धर्म आणि लिंगाचे बंधन नसतं असं म्हणतात. अशाच एक प्रेम कहाणी उत्तरप्रदेशातून समोर येत आहे. ज्यामुळे सर्वांचे डोकं चक्रावले आहे. चक्क एका सूनेला आपल्या नवऱ्यासोबत नाही तर सासू सोबत प्रेम जडलं आहे. दोन वर्षापूर्वी लग्न करून सून घरी आली होती परंतू तीला तिच्या सासूसोबत प्रेम झालं. (हेही वाचा-  लग्नाला नकार दिल्याने तरुणीच्या चेहऱ्यावर रॉडने लिहलं नाव, आरोपी फरार)

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंद येथील एका गावात  घडली आहे. सासूने या संदर्भात खुलासा केला आहे की, सूनेला तिच्या नवऱ्यासोबत राहायचे नाही. सूनेचे पहिल्या दिवसापासून वागणे बरोबर नाही. नेहमी वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत असते. एवढं नव्हे तर तीला शारिरीक संबंध ठेवायचे. याला कंटाळून सासूने पोलिस ठाण्यात धाव घेतली. महिलेचा सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. सूनेने सांगितले की, तीला तिच्या सासूवर पहिल्या नजरेत प्रेम झालं.

आश्चर्यकारक म्हणजे, सूनेने शारिरीक संबंध ठेवण्यासाठी सासूला अनेकदा धमकी दिली. तीला सासूसोबत लग्न करायचे असं देखील सांगितले. तीला तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे. सून सासूच्या प्रेमात एवढी वेडी झाली आहे की, जेव्हा सासरे सासू सोबत असतात त्यावेळी त्यांना दूर राहण्यास सांगते. सासूने या घटनेची माहिती सूनेच्या पालकांना देखील दिली आहे. सूनेने सासूला मरे पर्यंत तूझी साथ देईन अशी वचन दिले आहे. यावर सासूने तिला सांगितले की, माझ्या आयुष्याचे काहीच दिवस राहिले आहे. तर सूनेने सासूला सांगिलते की, तुमच्यासाठी मी माझा जीव देखील देईन.