Uttar Pradesh Crime: तरुणीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने विकृतीची हद्दच पार केली आहे. तरुणीच्या चेहऱ्यावर आपलं नाव कोरलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशाती लखीमपूर खिरी येथे घडली आहे. घटनेनंतर पीडितेने पोलिसांनाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत आरोपीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आरोपी गावातून फरार असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत आरोपीला त्याच्या आईने आणि बहिणीने मदत केली होती. (हेही वाचा- महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेत्यावर करण्यात आले होते गंभीर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी 19 एप्रिल रोजी सामान घेण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी पाठीमागून आरोपी आला आणि तीला सोबत चल अस म्हणाला. परंतु तरुणीने त्याला नकार दिली. त्याला राग आला आणि त्याने थेट पीडितेला उचलून घरी आणले. तेथे तिचे तोंड कापडाने बांधले. त्यानंतर एक लोखंडी रॉड गरम केला. पीडित आरडा ओरड करत होती. त्याने एक ऐकले नाही. तेवढ्याच आरोपीच्या आई आणि बहिणी घटनास्थळी आल्या. पीडितेच्या हाताला आणि पायाला पकडले आणि आरोपीने तरुणीच्या चेहऱ्यावर गरम रॉडने 'अमन' असं नाव लिहले.
पीडित वेदनेने ओरडत होती, तेथून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण हात पाय दोघींन्ही घट्ट पकडले होते. त्यानंतर पीडित कशी बशी जीव वाचवून घटनास्थळावरून पळून आली आणि थेट पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी तरुणीने पोलिस अधिकाऱ्यांसमोर मांडली. या विकृत घटनेनंतर पोलिसही चक्रावले होते. आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपीला लग्नासाठी तरुणीने नकार दिला होता. याचा रागात धरत त्याने हे पाऊल उचलले.