MDH Denies Allegation: हाँगकाँग (Hong Kong) आणि सिंगापूर (Singapore)या देशांत एमडीएचच्या ३ मसाल्यांमध्ये कॅन्सरजन्य पदार्थ (Carcinogenic substances)आढळ्याने मसाल्यांवर बंदी घालण्यात आल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यावर आता एमडीएच (MDH)ने शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात ग्राहकांना त्यांची उत्पादने 100 टक्के सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूर येथील अन्न नियामकांकडून त्यांच्या काही उत्पादनांमध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड आढळल्याचे आरोप फेटाळले आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव असल्याचे एमडीएचकडून सांगण्यात आले आहे. (हेही वाचा : Carcinogenic Ingredient in MDH and Everest: एमडीएच आणि एव्हरेस्टच्या 4 उत्पादनांवर हाँगकाँग-सिंगापूरमध्ये बंदी; कॅन्सर होण्याचा धोक असल्याचे स्पष्टीकरण)
हाँगकाँगच्या सेंटर फॉर फूड सेफ्टी (CFS)ने म्हटल्याप्रमाणे, एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय ब्रँडच्या अनेक प्रकारच्या प्री-पॅकेज मसाल्यांच्या नमुन्यांमध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड आढळून आले होते. यात एमडीएचच्या मद्रास करी पावडर, सांभर मसाला मिश्र मसाला पावडर आणि करी मसाला पावडर यांचा समावेश होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ या मसाल्यांची हाँगकाँगमध्ये विक्री थांबवली होती. त्यावर, शनिवारी एमडीएकडून निवेदन जारी करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, कंपनीला हाँगकाँग आणि सिंगापूर अन्न सुरक्षा नियामकांकडून कोणतेही पत्र मिळालेले नाही. त्यांच्या काही उत्पादनांमध्ये कॅन्सरजन्य पदार्थ इथिलीन ऑक्साईडचा समावेश असल्याचे दावे असत्य आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत", असे म्हटले आहे.
"याव्यतिरिक्त, एमडीएचने म्हटले आहे की भारतीय अन्न नियामक FSSAI ला या प्रकरणाबाबत हाँगकाँग किंवा सिंगापूर अधिकार्यांकडून कोणतेही संप्रेषण किंवा चाचणी अहवाल प्राप्त झालेले नाहीत. एमडीएचवरील हे आरोप निराधार आणि त्यात ठोस पुराव्यांचा आरोप आहे. असे निवेदनात म्हटले आहे.एमडीएच त्यांच्या ग्राहकांना सर्व उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबद्दल आश्वस्त करते. मसाल्यांच्या साठवण, प्रक्रिया किंवा पॅकिंग अशा कोणत्याही टप्प्यात इथिलीन ऑक्साइड वापरले जात नाही. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि सुरक्षा मानकांचे कंपनीकडून पालन केले जाते, असे निवेदनात म्हटले आहे.
MDH on Saturday assured consumers that its products are 100 per cent safe and rejected the allegations of the presence of certain pesticides in some products by Hong Kong and Singapore food regulators.
Earlier this month, Hong Kong's Center for Food Safety (CFS) said that… pic.twitter.com/pU33im6OCD
— Mirror Now (@MirrorNow) April 28, 2024