Photo Credit- X

Carcinogenic Ingredient in MDH and Everest: एमडीएच आणि एव्हरेस्ट हे भारतातील दोन नामवंत मसाले ब्रँड आहेत. भारतात त्यांची लोकप्रीयता प्रचंड असून ते आता जगभरातही फेमस आहेत. मात्र, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये त्यांच्या काही उत्पादनाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असून MDH च्या 4 मसाल्यांच्या ब्रँड आणि एव्हरेस्टच्या एका ब्रँडवर बंदी घातली आहे. एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांमध्ये कीटकनाशक, इथिलीन ऑक्साईड असल्याचे हाँगकाँगच्या अन्न नियामक प्राधिकरण सेंटर फॉर फूड सेफ्टीने म्हटले आहे. यासोबतच ग्राहकांसाठी एक ॲडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे. (हेही वाचा : नेस्ले कंपनी वादात, लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचा समावेश; भारतासह दुर्बल देशांमध्ये विक्री- रिपोर्ट)

नक्की प्रकरण आहे तरी काय?

अन्न प्राधिकरण सेंटर फॉर फूड सेफ्टीच्या मते, या उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण खूप जास्त आहे, ज्यामुळे कर्करोगासारखे घातक आजार होऊ शकतात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईडला "गट 1 कार्सिनोजेन" म्हणून वर्गीकृत केले आहे. बंदी घातलेल्या मसाल्यांमध्ये MDH चे तीन मसाले, मद्रास करी पावडर, सांबार मसाला आणि करी पावडर मिक्स मसाला पावडर आहेत. तर,एव्हरेस्टचे फिश करी मसाला हे एक उत्पादन आहे. या मसाल्यांमध्ये कीटकनाशके, इथिलीन ऑक्साईड आहे. दरम्यान, एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोघांनीही अन्न नियामकांच्या दाव्यांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रकरण कधी उघडकीस आले

सेंटर फॉर फूड सेफ्टीकडून हाँगकाँगमधील तीन रिटेल स्टोअरमध्ये तपासनी सुरू होती. हा त्यांच्या नियमित तपासणीचा भाग होता. चाचणीच्या निकालात असे दिसून आले की नमुन्यांमध्ये कीटकनाशक, इथिलीन ऑक्साईडटा समावेश आहे. नियामकाने विक्रेत्यांना विक्री थांबवून उत्पादने काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

सीएफएस प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, एमडीएच आणि एव्हरेस्टच्या उत्पादनातील समावेश घटके धोकादायक किंवा आरोग्यासाठी प्रतिकूल नाही. यात दोषी आढळल्यास कमाल $50,000 दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. सीएफएसने सांगितले की, तपास सुरू आहे आणि आवश्यक असल्यास योग्य ती कारवाई होण्याची शक्यता आहे.