Air India Suspends All Flight Operations To Tel Aviv: गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेतील परिस्थिती सामान्य नाही. इस्रायल-पॅलेस्टाईन (Israel-Palestine) आणि लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर एअर इंडिया (Air India) ने पुढील आदेश येईपर्यंत इस्रायलला जाणारी आपली सर्व उड्डाणे स्थगित (Flights Cancelled) केली आहेत. एअर इंडियाने शुक्रवारी याबाबत घोषणा केली. एअर इंडियाने यासंदर्भातील सूचना देताना म्हटलं आहे की, 'मध्य पूर्वेतील सध्याची परिस्थिती पाहता, ते तेल अवीव, इस्रायलला पुढील सूचना मिळेपर्यंत उड्डाणे स्थगित करत आहेत. याआधीही एअर इंडियाने 8 ऑगस्टपर्यंत उड्डाणे स्थगित केली होती. ही स्थगिती वाढवण्यात आली आहे.'
एअर इंडियाने सांगितले की, आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत आहोत. आमच्या प्रवाशांना तेल अवीव आणि तेथून पुष्टी केलेल्या बुकिंगसह पूर्ण परतावा देत आहोत. आमचे प्रवासी आणि क्रू यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. (हेही वाचा -Israel-Gaza Conflict: गाझा येथे शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 16 ठार, पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांची माहिती)
एअर इंडिया ट्विट -
In view of the current situation in parts of the Middle East, scheduled operation of our flights to and from Tel Aviv are suspended with immediate effect until further notice. We are continuously monitoring the situation and are offering a full refund to…
— Air India (@airindia) August 9, 2024
एअर इंडियाने पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की, फ्लाइट रद्द करणे आणि परतावा संबंधित अधिक माहितीसाठी, प्रवासी 011-69329333/011-69329999 वर 24x7 संपर्क करू शकतात. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1200 लोकांना ठार केले होते, तर 250 इस्रायलींना ओलीस ठेवले होते. मीडिया रिपोर्टनुसार, हमासने बहुतेक महिला आणि मुलांची सुटका केली आहे, परंतु अद्याप 110 लोक कैदेत आहेत. या लोकांच्या सुटकेसाठी इस्रायल प्रयत्न करत आहे. (हेही वाचा - Conflict In Israel: लंडनमध्ये पॅलेस्टिनी समर्थक आणि इस्त्रायल समर्थक यांच्यात तुफान हाणामारी)
इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान इस्रायलचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने नौदलाची लढाऊ विमाने मध्य पूर्वेतील तळावर पाठवली आहेत, अशी माहिती एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिली आहे. मंगळवारी इराकमधील लष्करी तळावर रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अमेरिकन कर्मचारी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन रॉकेट लष्करी तळावर आदळल्याने पाच अमेरिकन सेवा सदस्य आणि दोन कंत्राटदार जखमी झाले.