Air India Express Flight Emergency Landing: केरळला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग; अबुधाबीमध्ये आपत्कालीन लँडिंग
Air India Express Flight (PC -Wikimedia Commons)

Air India Express Flight Fire: अबुधाबी (Abu Dhabi) हून कालिकत (Calicut) ला जाणाऱ्या इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे (Air India Express Flight) अबुधाबी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले आहे. विमानाच्या इंजिनला आग लागल्यानंतर विमान सुखरूप उतरले आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अबुधाबीहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट IX348 मध्ये 184 प्रवासी होते. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमानात आग लागली. विमानाच्या पायलटला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी विमानाचे अबुधाबी येथे इमर्जन्सी लँडिंग केले. (हेही वाचा - Digi Yatra to be implemented: पुणे विमानतळावर राबवण्यात येणार डिजी यात्रा उपक्रम; Airport वर स्विफ्ट चेक-इन करण्यास 'अशी' होणार मदत)

विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता सर्व प्रवासी सुरक्षित असून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे. सध्या विमान अपघाताच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वी लखनौहून कोलकात्याला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानातून पक्षी आदळल्याने 180 जणांचा जीव धोक्यात आला होता.

दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दिल्लीच्या IGI विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. या विमानात 140 प्रवासी होते.