CWC Meeting: पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस कार्यसमितीची उद्या बैठक, सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही होणार चर्चा
Rahul Gandhi | (Photo Credit : Facebook)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2022) यावेळी काँग्रेसला (Congress) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ज्या पद्धतीने जाहीर सभा घेतल्या, त्यानुसार काँग्रेस जास्त जागा जिंकेल, असे वाटत होते. मात्र, निवडणूक निकालांनी देशातील सर्वात जुन्या पक्षावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षनेतृत्वालाही याची चिंता आहे. उत्तर प्रदेश, (UP) उत्तराखंड, (Uttarakhand) पंजाब, (Punjab) मणिपूर (Manipur) आणि गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर पक्षाने आता काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यसमितीची बैठक रविवारी दुपारी 4 वाजता दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) कार्यालयात होणार आहे. काँग्रेसने शनिवारी ही माहिती दिली.

Tweet

सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा 

या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची खराब कामगिरी, पराभवाची कारणे आणि पक्षाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. पाचही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला यावेळी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एवढेच नाही तर पंजाबची सत्ताही हातातून गेली. यानंतर सातत्याने पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. (हे ही वाचा Punjab Assembly Elections 2022 Results: Bhagwant Mann यांनी घेतली राज्यपालांची भेट; 16 मार्चला घेणार पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ)

पाचही राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीला महत्त्व आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबसह पाचही राज्ये गमावल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी जनतेचा निकाल नम्रपणे स्वीकारला आहे. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानले.