Chhatishgrah Crime PC YouTube

Chhatishgarh Shocker: छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे नेते अमर अग्रवाल, यांनी सोमवारी विश्व हिंदू परिषदेच्य ब्लॉक समन्वयकावर जमिनीच्या वादातून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना खरसिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमर अग्रवाल यांनी २०१९ मध्ये खरसिया मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. हेही वाचा-  माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर तोंडात सुरु झाली जळजळ, रक्ताच्या उलट्या; गुरुग्रामच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या गोळीबार घटनेत तीन गोळ्या लागल्यागची माहिती समोर आली. गोपाल गिरि असं गोळी लागल्याचे नाव आहे. या घटनेत गोपाल गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी रायगड वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आम नेते अमर अग्रवाल यांनी हस्तक्षेप केला आणि या पूर्वी त्यांनी जमिनीच्या व्यवहारापासून दूर न राहिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. धमकी दिल्यानंतर त्यांनी एकमेकांवर हल्ला देखील केला होता. तहसीलदार आणि पटवारी यांच्या उपस्थितीत आप नेत्याने तरुणावर तीन गोळ्या झाडल्या आणि तो जमिनीवर पडला. पोलिस फरार आरोपी अमर अग्रवाल यांच्या शोधात आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहरात छापा मारण्यास सुरुवात केली आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.