Gurugram Restaurant Shocker: माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर तोंडात सुरु झाली जळजळ, रक्ताच्या उलट्या; गुरुग्रामच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल (Watch Video)

तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून लोक घाबरले आणि पाण्याने चुळा भरू लागले, मात्र काही फरक पडला नाही. त्याचवेळी लोकांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांकडेही मदत मागितली, मात्र रेस्टॉरंटच्या एकाही कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही.

Gurugram Restaurant Shocker: माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर तोंडात सुरु झाली जळजळ, रक्ताच्या उलट्या; गुरुग्रामच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल (Watch Video)
Gurugram Restaurant Shocker

Gurugram Restaurant Shocker: जर तुम्हीही रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर बडीशेप किंवा माऊथ फ्रेशनर खात असाल, तर सावध व्हा. हे माऊथ फ्रेशनर तुमच्या जीवाला धोका पोहोचवू शकते. नुकतेच गुरूग्राममध्ये असे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे Laforestta Cafe - Bar & Restaurant नावाच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या तीन जोडप्यांना जेवण झाल्यानंतर वेटरने माऊथ फ्रेशनर दिले. मात्र ते सेवन करताच प्रत्येकाच्या तोंडात जळजळ होऊ लागली आणि काही समजण्यापूर्वीच त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून लोक घाबरले आणि पाण्याने चुळा भरू लागले, मात्र काही फरक पडला नाही. त्याचवेळी लोकांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांकडेही मदत मागितली, मात्र रेस्टॉरंटच्या एकाही कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही. त्यानंतर या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना रुग्णालयात दाखल केले. यातील जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या लोकांच्या तोंडातून रक्त येताना दिसत आहे. घडल्या प्रकाराबाबत याबाबत खेडकिदौला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा: Viral Video: मुलगा, सुनेने केली मानसिक आजारी असलेल्या वृद्ध वडिलांना मारहाण, व्हिडीओ व्हायरल)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2024 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).