Photo Credit- X

Chhatarpur Murder: गुरु आणि शिष्याच्या परंपरेला काळींबा फासणारी घटना मध्य प्रदेशमधील छतरपूरमधून समोर आली आहे. विद्यार्थ्याने प्राचार्यांवर (Principal)गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आरोपी विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या स्कूटरसह पळून गेला. छतरपूर पोलिसांनी विद्यार्थ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्राचार्य सुरेंद्र कुमार सक्सेना यांची गोळ्या झाडून हत्या (Murder)करण्यात आली. (Tamil Nadu Fishermen Arrests: 14 भारतीय मासेमारांना श्रीलंका नौदलाकडून अटक, 2 बोटी जप्त)

धामोरा शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांची नियुक्ती झाली होती. आरोपी विद्यार्थ्याने प्राचार्यांना टॉयलेटमध्ये गोळ्या घालून ठार केले आणि तेथून पळ काढला. आरोपी विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तो धिलापूर गावचा रहिवासी असून त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी विद्यार्थी येताना कैद झाला आहे.

मुख्याध्यापकांची स्कूटर गायब

हत्येच्या घटनेनंतर प्राचार्य सुरेंद्रकुमार सक्सेना यांची स्कूटरही शाळेतून गायब आहे. आरोपी विद्यार्थी स्वतः स्कूटरसह फरार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आरोपी पकडल्यानंतरच गुन्ह्याचे कारण समजेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

स्फोटाच्या आवाजाने विद्यार्थी घाबरले

शाळेच्या आवारात गोळीबाराची घटना होताच इतर विद्यार्थी भयभीत झाले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. शिक्षिकेच्या डोक्यात एकदाच गोळी झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.