Delhi Crime: दिल्लीत दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीत एका कारमध्ये महिलेवर क्रूरपणे हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एकाने व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. ही घटना शनिवारच्या रात्री घडली. दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात ही घडली. महिलेला तीच्या साथीदाराने का मारले हे अद्याप समोर आलेले नाही. (हेही वाचा- दिल्ली येथील क्रिकेट मैदानावर विजेचा धक्का, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये प्रवास करणारे जोडपे बाहेर जात होते. त्यावेळीस दोघांचे भांडण सुरु झाले. भाडंणानंतर पुरुषाने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना डॉन बॉस्को शाळेजवळ एस ब्लॉक ग्रेटर कैलास पार्ट २ मध्ये ही घटना घडली. हा व्हिडिओ अजय देव यांनी ट्वीटवर अपलोड केला आहे. कार क्रमांक DL 2C AM 4852 आहे. ज्यात महिला आणि तीचा साथीदार बसले होते.
या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. ट्वीटरवर दिल्ली पोलिसांना टॅग करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे. या घटनेनतंर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.