Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

Himachal Video: कार पार्क करताना मोठी दुर्घटना, अनियंत्रित वाहन 30 फुट खड्ड्यात कोसळले (Watch Video)

हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये सोमवारी सकाळी एक महिला कार पार्क करत असताना मोठी दुर्घटना घडली. कार पार्क करत असताना कार मागे वळवत असताना थेट ३० मीटर खोल खड्डयात कोसळली.

राष्ट्रीय Pooja Chavan | Jul 09, 2024 11:16 AM IST
A+
A-
car parking Video PC TW

Himachal Video: हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये सोमवारी सकाळी एक महिला कार पार्क करत असताना मोठी दुर्घटना घडली. कार पार्क करत असताना कार मागे वळवत असताना थेट 30 मीटर खोल खड्डयात कोसळली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत महिला जखमी झाली आहे. (हेही वाचा- नागपूर मध्ये भरधाव वेगात असलेल्या बसने दिली सायकलस्वाराला धडक; CCTV मध्ये घटना कैद ( Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार,  ही घटना सोलन शहरातील पॉवर हाऊस रोडवर घडली आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. कारमधील महिला जखमी झाली आहे. महिला सकाळी आपल्या दुकानात जाण्यासाठी कारने सोलन येथील पॉवर हाऊस रोडवर पोहोचली. कार पार्क करत असताना महिलेचा कार वरिल नियंत्रण सुटलं  आणि कार पार्किंगच्या टोकाला असलेल्या ३० फुट खड्ड्यात कोसळली.

घटनेनंतर स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. लोकांनी महिलेच्या मदतीनसाठी धाव घेतला. अपघातातील महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोलन येथील रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहे. पूनम असं जखमी महिलेचे नाव आहे. उपचारानतंर महिलेला घरी सोडण्यात आले आहे.


Show Full Article Share Now