कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी आता भारताला लवकरचं चौथे शस्त्र मिळण्याची शक्यता आहे. अहमदाबाद येथील औषधी कंपनी Zydus Cadila या महिन्यात भारतात कोविड-19 विरुद्ध ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरीसाठी अर्ज करणार आहे. ही लस मे महिन्यातच मंजूर होईल, असा कंपनाचा विश्वास आहे. कंपनीने दरमहा एक कोटी कोरोना लसींचे उत्पादन घेत असल्याचा दावा केला आहे.
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, ही लस मंजूर झाल्यास ZyCoV-D ही भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये वापरली जाणारी चौथी लस असेल. मेड इन इंडिया, कंपनीची लस उत्पादन दरमहा 3-4 कोटी डोसपर्यंत वाढवण्याची योजना आहे. यासाठी दोन अन्य उत्पादन कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. (वाचा - सरकारचा मोठा निर्णय! ब्रिटनला जाणारे Covishield लसीचे 50 लाख डोस भारतात वापरण्यात येणार)
ZyCoV-D या लसीला 2 ते 8 डिग्री सेल्सियस दरम्यान ठेवावे लागते. ही 25 डिग्री सेल्सियस तापमानाला स्थिर राहते. त्याचा डोस लागू करणे देखील खूप सोपे आहे. या लसीला इंट्राडर्मल इंजेक्शनद्वारे दिले जाऊ शकते. ZyCoV-D च्या आत्पकालीन वापर मंजूर झाल्यास देशाच्या लसीकरण मोहिमेसंदर्भातील उणीव दूर होण्यास मदत होईल.
एप्रिलच्या सुरुवातीला Zydus Cadila यांनी जाहीर केले होते की, कोविड च्या सौम्य प्रकरणांवर उपचार करण्यासाठी त्यांचे औषध Virafin ला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून प्रतिबंधित आणीबाणीच्या वापराची मंजुरी मिळाली आहे. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शेरविले पटेल यांनी ZyCoV-D या कोरोना लसीच्या सर्व बाबींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ZyCoV-D ही लस आपत्काळीन वापरासाठी मंजुरी मिळवण्याच्या अगदी जवळ असल्याचं म्हटलं.
ZyCoV-D लसीची चाचणी करताना 12 ते 17 वयोगटातील मुलांचाही समावेश करण्यात आला आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळविण्यासाठी आम्ही अर्ज करू, असंही शरविल पटेल यांनी सांगितलं आहे. Zydus Cadila मंजूर होताचं जुलैपासून लस तयार करण्यास सुरुवात करतील.