Ghaziabad PC TW

Ghaziabad Accident: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. विरुध्द दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने स्कूटरला धडक दिली. या धडकेच आई आणि मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली आहे. ही घटना एस्क्प्रेसवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (हेही वाचा- जगबुडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड, मुंबईकडे होणाऱ्या वाहतूकीवर परिणाम)

मिळालेल्या माहितीनुसाकर, स्कूटीवरून आई आणि मुलगा हरिद्वार येथील गंगा नदीत स्नान करून दिल्लीच्या दिशेने परतत होते. त्याचवेळी एक्स्प्रेसवेवर विरुध्द दिशेने एक भरधाव कार येत होती. भरधाव कारची स्कूटीला धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती की,  स्कूटीवरील दोघे जण १० फुट हवेत उडाले. या घटनेत दोघे जण हवेत उडाले. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ 

या प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केले आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी सांगितले की, गाझियाबाद येथील मेहरौली अंजरपासजवळ हा अपघात झाला. अपघातात मारुती सुझुकी अल्टो कार होती. यश गौतम आणि त्यांची आई मंजू देवी यांचा अपघातात मृत्यू झाला. दोघेही दिल्लीतील पश्चिम विनोद नगर येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.