 
                                                                 मोदी सरकार लवकरच आपल्या लाखो कर्मचार्यांना एक मोठी खूषखबर देणार आहे. सातवं वेतन आयोग (7th Pay Commission) लागू केल्यानंतर आता कर्मचार्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये (Basic Salary) वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्यांच्या त्याचा फायदा नेमका कधीपासून मिळणार? याची माहिती देण्यात आलेली नाही.(हेही वाचा, 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, महत्त्वाचा भत्ता बंद, मासिक वेतनात घट होण्याची शक्यता)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार सार्या कर्मचार्यांचे किमान वेतन वाढवण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सध्या तयारी सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी सरकार त्याची घोषणा करू शकते. ही वाढीव वेतन श्रेणी लाखो कर्मचार्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार असेल. त्यामुळे देशभरातील लाखो सरकारी कर्मचार्यांना वेतन आता आठ हजार रूपये पर्यंत वाढ मिळण्याची शक्यता आहे.
मागील अनेक वर्षांपासून केंद्रीय कर्मचारी या वेतनवाढीसाठी मागणी करत होते. सध्या कर्मचार्यांना किमान 18 हजार रूपये बेसिक सॅलरी दिली जाते. सोबत इतर भत्ते दिले जातात.
मागील महिन्यातच केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामधेय 17% वाढ करण्यात आली आहे. त्याचा फायदा सुमारे50 लाख सरकारी कर्मचार्यांना मिळाला आहे. 1 कोटी सरकारी कर्मचारी आणि पेंशन धारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर वाढीव 17% डीए प्रमाणे पगार देण्यात आला. यापूर्वी डीए 2-3 % वाढवला जात असे. मात्र यंदा सरकारने 5% डीए वाढवला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
