7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 8,000 रुपये वाढ होण्याची शक्यता
Indian rupee | (Photo Credits: PixaBay)

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन (Monthly Salary) या महिन्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारी कर्मचारी (Central Employees) हे गेले प्रदीर्घ काळा आपल्या मूळ वेतन 18000 रुपयांवरुन वाढ करत ते 26,000 रुपये इतके करावे अशी मागणी केंद्र सरकारकडे सातत्याने करत आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांना खूशखबर देण्याच्या विचारात आहे. सांगितले जात आहे की, केंद्र सरकार या महिना अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर महिनाखेरीस सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) शिफारशींनुसार केद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी (Basic Salary) वाढवून देण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 8 हजार रुपायांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार सांगायचे तर केंद्र सरकारने सॅलरी हाईकसाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर या महिन्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत हा विषय चर्चेला येऊन त्यावर सर्वसहमती बनली तर, सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसोठी अर्थिक वाढीसह 'अच्छे दिन' येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या महन्यातच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये 5 टक्क्यांनी वाढ केली होती. याशिवाय केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा परिवहन भत्ता म्हणजेच टीए हासुद्धा वाढवला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणने असे की, सातवा वेतन आयोगानुसार त्यांचे मूळ किमान वेतन हे फारच कमी आहे. त्यामुळे सुमारे 8,000 रुपये इतके असलेले हे वेतन वाढवण्यात यावे. याशिवाय केंद्रीय कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्येसुद्धा वाढ मागत आहेत. (हेही वाचा, 7th Pay commission: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; राज्य सरकारकडून नववर्षाची भेट )

सध्यास्थितीत सातव्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्समध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणने असेकी हा फिटमेंट फॅक्टर बराच कमी आहे. तो वाढवून 3.68 टक्के करण्यात यावा. जेणेकरुन फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊन तो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होईल.