Congress flags | Representational Image | (Photo Credits: PTI)

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Assembly Election 2020) लागला असून जनतेने केजरीवाल सरकारच्या बाजूने कौल दिला आहे. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात दिल्लीत 15 वर्षे सरकार चालवणाऱ्याला काँग्रेसच्या (Congress) हाती सलग दुसऱ्यांदा निराशा लागली आहे. या निवडणुकीतही काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यातच काँग्रेस पक्षाला आणखी धक्का लागला असून त्यांच्या 63 आमदारांचे डिपॉझिट जप्त (Deposited Seized) केले जाणार आहे. निकालाची आकडेवारी पाहता काँग्रेसला प्रत्येक जागेवर 5 टक्क्यांहून कमी मत मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या उमेदवाराला 5 टक्क्यांपेक्षा कमी मते मिळतात, त्यांची डिपॉझिट जप्त केले जातात.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालाने विरोधी पक्षाला मोठा फटका बसला आहे. एकेकाळी संपूर्ण देशावर वर्चस्व निर्माण केलेला काँग्रेस पक्ष सध्या संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने यात आणखी भर घातली आहे. काँग्रेसच्या पक्षाने पहिल्यांदाच राष्ट्रीय जनता दलासोबत हात मिळवणी करत दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान काँग्रेस पक्षाने 63 तर, राष्ट्रीय जनता दलाल 4 जागेवर निवडणूक लढली. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. एवढेच नव्हेतर काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना 5 टक्क्यांपेक्षा कमी मत मिळाली आहे. यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. हे देखील वाचा- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांचे ट्विट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'बिचारा' म्हणून केला उल्लेख

दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण 672 उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यात 593 पुरूष तर, 79 महिलांचा समावेश होता. या निवडणुकीत एकूण 62.49 टक्के मतदान झाले होते. महत्वाचे म्हणेजे, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 5 टक्के कमी मतदान झाले आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांची जादू चालली आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैंकी तब्बल 62 जागेवर विजय मिळवला आहे. यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे आभार देखील मानले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाने 70 पैंकी 67 जागेवर विजय मिळवला होता.