जम्मू-काश्मीर: हंदवाडा येथील दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 3 जवान शहिद तर 7 जण जखमी
Representational Image (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) हंदवाडा (Handwara) येथील दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 3 जवान शहिद झाले असून 7 जवान जखमी झाले आहेत. काझियाबाद परिसराजवळ गस्तीवर असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर यांच्यासह 5 जवान शहीद झाले होते.

दरम्यान, गेल्या 36 तासांत 3 दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कूपवाडा येथील वांगम रफियाबाद येथे CRPF चे 3 जवान दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. या हल्ल्याला भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (हेही वाचा - COVID-19: दिल्लीत सशस्त्र सीमा दलाच्या 8 जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

जम्मू-काश्मीर पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद आणि जम्मू - काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांच्यासह 5 शूर जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले. याची आम्हाला खंत आहे, अशा शब्दांत दिलबाग सिंह यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.