Representational Image | (Photo Credits: PTI)

COVID-19: आज दिल्लीत सशस्त्र सीमा दलाच्या (Sashastra Seema Bal) 8 जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे जवान वेगवेगळ्या सरकारी आस्थापनांच्या सुरक्षेत तैनात होते. आतापर्यंत एसएसबीच्या 13 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

दरम्यान, रविवारी दिल्लीतील 25 BSF जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत दिल्लीत 42 बीएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली सरकारच्या आदेशाखाली कायदा व सुव्यवस्थेच्या कर्तव्यावर असणाऱ्या दिल्लीतील जामा मशिद आणि चांदनी महाल भागात तैनात करण्यात आलेल्या बीएसएफ जवानांच्या 126 व्या बटालियनमध्ये ही नवीन प्रकरणे समोर आली होती. (लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा - Coronavirus: गेल्या 24 तासांत देशात 2573 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 83 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; 4 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

प्राप्त माहितीनुसार, देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतात आतापर्यंत 42,836 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 11,762 रुग्ण बरे झाले असून 1389 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत देशात 2573 नवे रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.