Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
9 minutes ago

दिल्लीतील तळीरामांना उद्यापासून दारू खरेदीवर द्यावा लागणार अतिरिक्त 70% कर, दिल्ली सरकारचा स्पेशल कोरोना फी घेण्याचा निर्णय ; 4 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Chanda Mandavkar | May 04, 2020 11:38 PM IST
A+
A-
04 May, 23:37 (IST)

नवी दिल्लीतील तळीरामांना उद्यापासून दारू खरेदीवर अतिरिक्त 70% कर मोजावा लागणार असून दिल्ली सरकारने ही स्पेशल कोरोना फी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

04 May, 23:37 (IST)

नवी दिल्लीतील तळीरामांना उद्यापासून दारू खरेदीवर अतिरिक्त 70% कर मोजावा लागणार असून दिल्ली सरकारने ही स्पेशल कोरोना फी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

04 May, 23:37 (IST)

नवी दिल्लीतील तळीरामांना उद्यापासून दारू खरेदीवर अतिरिक्त 70% कर मोजावा लागणार असून दिल्ली सरकारने ही स्पेशल कोरोना फी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

04 May, 23:20 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे 771 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले रुग्णांची एकूण संख्या 14,541 वर पोहोचली आहे. यातील 35 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 583 वर पोहोचला आहे अशी आरोग्य विभागाने दिली आहे.

04 May, 22:28 (IST)

नवी दिल्लीत आज 349 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 4898 वर पोहोचली आहे. मात्र गेल्या 24 तासांत एकही रुग्ण दगावले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

04 May, 22:11 (IST)

प्रसिद्ध कलाकार रणजित दहिया यांनी वांद्रे येथील आपल्या घराच्या भिंतीवर अभिनेता इनफान यांचे छायाचित्र रेखाटले आहे. तसेच इरफान खान हा माझ्या आवडत्या कलाकरांपैकी एक होता, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

04 May, 21:40 (IST)

राजस्थान मध्ये 175 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3061 वर पोहोचली आहे. तसेच 6 नव्या रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 77 इतका झाला आहे.

04 May, 20:59 (IST)

कोरोनाच्या संकटामुळे राज्यभरातल्या रखडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

 

04 May, 20:41 (IST)

मुंबईमध्ये आज 510 नव्या कोरोना रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 18 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 9123 वर पोहोचली आहे.

 

04 May, 20:29 (IST)

कर्नाटकामध्ये दारूची दुकाने उघडल्यानंतर पहिल्याचं दिवशी 45 कोटी रुपयांची दारू विक्री करण्यात आली आहे. कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.  

Load More

देशभरासह महाराष्ट्रावर कोरोना व्हायरसचे महासंकट ओढावले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतर लॉकडाउनचा निर्णय राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती पाहून जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. राज्यातील मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आता केंद्र सरकारने विविध राज्यात अडकलेले कामगार, विद्यार्थी आणि भाविकांना आपल्या घरी जाता यावे यासाठी स्पेशल ट्रेन आणि बसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

परराज्यातील मजूर आणि कामगार हे लॉकडाउनमुळे अडकले होते. परंतु आता त्यांनाआपल्या घरी जाता येत आहे. त्यामुळे मजूर आणि कामगारांची परिस्थिती पाहता त्यांच्याकडून रेल्वे तिकिटांचे शुल्क आकारु नयेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. तसेच या सर्वांची वैद्यकिय चाचणी आणि रजिस्ट्रेशन करुन आपापल्या राज्यात पाठवले जात आहेत. दुसरीकडे पंजाब येथे कोरोनाबाधितांचा आकडा अचानक 300 वरुन 1 हजारांच्या पार गेल्याने सध्या राजकरण तापले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर नागपूरात लॉकडाउन येत्या 17 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. त्याचसोबत कंन्टेंटमेंट झोनव्यतिरिक्त 33 टक्के ऑफिसेस बंद राहणार आहेत. मात्र अत्यावश्यक सेवासुविधा नागपूरात सुरु राहतील असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.


Show Full Article Share Now